भारत विरुद्का श्रीलंका: कोलंबो मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका या दोन देशांमध्ये अशिया कप चा अंतिम सामना पार पाडला. आज आशिया कप जिंकण्या साठी दोन्ही देशांनी खूप मेहनत केली होती. भारताने पाकिस्तान ला हरवून अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले होते. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान च्या सामन्यात श्रीलंकेने 2 गडी राखून पाकिस्तानला हरवले आणि अंतिम सामना खेळण्यासाठी भारता विरुदध आपले स्थान पक्के केले. आज श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी चा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह याने आपल्या प्रथम ओव्हर मध्ये श्रीलंकेच्या कुसल परेरा या ची विकेट घेतली. त्यानंतर मात्र मोहम्मद सिराज एका मागोमाग श्रीलंकेच्या सहा फलंदाजांच्या विकेट घेतल्या. अष्टपैलु हार्दिक पंड्या तीन विकेट घेतल्या. सोळावा ओव्हर च्या दुसऱ्या गेंदावर श्रीलंकेची टीम 50 धावा ऑल आऊट झाली होती. भारताला जिंकण्यासाठी केवळ 51 धावांची गरज होती. आज रोहित शर्मा ऐवजी शुभमन गिल सोबत ईशान किशन फलंदाजी करायला उतरला. शुभमन गिल 27 (19) तर ईशान किशन याने 23 (18). सतव्या ओव्हर च्या पहिल्या गेंदा वर भारताने विजय पटकवला, तो ही सगळे गडी राखून.'कुलदीप यादव याला 'प्लेयर ऑफ टुर्नामेंट हा किताब मिळाला तर 'मोहम्मद सिराज' याला 'प्लेयर ऑफ द मैच हा किताब मिळाला. भारताने पाच वर्षानंतर आशिया कप वर आपले नाव कोरले.