"२०२२" या वर्षी यूएस व्हिसा अर्जाला रिजेक्ट-ओ-मीटरचा सामना करावा लागला.

यूएस स्टेट डिपार्टमेंटचा २०२२ मध्ये विद्यार्थी आणि प्रवासी व्हिसाचा अर्ज नाकारण्याचा दर हा अभूतपूर्व आहे व सुमारे ३५℅ आहे, असे कॅटो संस्थेने नव्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समजते. 
कॅटो इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार व्हिसा नाकारण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या सरासरी व्हिसा नाकारण्यापेक्षा जास्त आहे.
परंतु, भारताचा नकार दर हा मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे, भारतातील यू.एस. दूतावासाने इतर कोणत्याही देशापेक्षा ८२,००० अधिक विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत. २०२२ मध्ये, ९५% भारतीय विद्यार्थ्यांना यूएसएचा विद्यार्थी व्हिसा मंजूर करण्यात आला आहे व केवळ ७% व्हिसा अमेरिकेने भारतासाठी नाकारला.
मोनॅकोमध्ये सर्वोत्कृष्ट आणि सर्वात कमी व्हिसा नाकारण्याचे प्रमाण हे ०% आहे किंवा इतर देशांमध्ये इस्रायल २%, अर्जेंटिना ४%, हाँगकाँग ५%, जपान ६%, मेक्सिको ६%, (भारत ७%), झेकिया ८%, पोर्तुगाल ९%, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर आणि यूएई १०%, स्पेन ११%, फिलीपिन्स, जर्मनी, डेन्मार्क, इंडोनेशिया १२%, फिनलंड, फ्रान्स, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कतार १३%, सौदी अरेबिया, ब्राझील १४%, व्हिएतनाम १५%, यूके १६%, नॉर्वे १६% , दक्षिण कोरिया, नेदरलँड १७%, तुर्की २०%, आयर्लंड २१%, श्रीलंका २२%, इजिप्त २३%, थायलंड २४%, इथिओपिया २५%, नायजेरिया २६%, रशिया २६%, बांगलादेश ३०%, चीन ३०%, पाकिस्तान ३१%, कोलंबिया ३३%, व्हेनेझुएला ३४%, युक्रेन ४१%, केनिया ४२%, सीरिया ४३%, इराक ४५%, अफगाणिस्तान ५३%, इराण ५४%, क्युबा ५७%, कॅनडा ५८%, रवांडा ६३%, सोमालिया, ४७% मॉरिटानिया ९०%, आणि मायक्रोनेशिया 1००% व्हिसा नाकारले गेले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने