मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आंदोलकांना ठाण्यातून आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा पाठिंबा...


ठाण्यात आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा मराठा समाजाला पाठिंबा! जालना येथील साराटी गावात दोन सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करते मनोज जरांगे पाटील व इतर आंदोलकांवर पोलिसांच्या माध्यमातून लाठी चार्ज करण्यात आला.त्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले अनेक आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभरात छेडण्यात आले अनेक राजकीय नेत्यांनी देखील जखमी आंदोलकांची भेट घेतली.

तसेच ठाण्यामध्ये मराठा आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ भारतीय मराठा महासंघाने 11 सप्टेंबर 2023 रोजी ठाणे बंदची हाक दिली आहे. आणि याच ठाणे बंदच्या हाकेला आंबेडकरी चळवळ येथील नेते कर्मवीर सुनील खांबे यांच्या पक्षाच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवला आहे.

"जालना येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा आम्ही आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते तीव्र निषेध नोंदवत आहोत. आरक्षण हा मानवतेचा हक्क आहे. आणि आरक्षण हे मराठा समाजाला देखील मिळालंच पाहिजे आणि येत्या 11 सप्टेंबर रोजी ठाणे बंदच्या हाकेला आमचा ठाम पाठिंबा आहे व आम्ही आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सहभागी होणार आहोत", असे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व AUA पक्षाचे संदीप खांबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी मराठा आंदोलकांना या दर्शवलेल्या पाठिंब्यानंतर ठाण्यात एक अनोख्या एकतेचा संदेश दिला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने