विखे पाटलांना भंडाऱ्याचा अभिषेक! धनगर समजाचा संताप...

राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाचा प्रश्नदेखील जोर धरत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुद्धा हाती काही न आल्याने संतापलेला धनगर समाज आपल्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री विखे पाटलांसोबत सोलापुरात जमले. या चर्चेदरम्यान धनगर समाज समितीतील शेखर बंगाळे नावाच्या कार्यकर्त्याने विखे पाटलांवर भंडाऱ्याची उधळण केली. याप्रकरणी भंडारा उधळणकर्त्याला मारहाण झाल्याचे दृश्य व्हिडिओ माध्यमातून समोर आले आहे.

घडलेल्या घटनेवरून धनगर समाजाचा सरकारविरुद्धचा संताप समोर दिसत आहे. या घटनेवर भाष्य करताना भाजपा नेते गोपीचंद पडलकरांनी प्रतिक्रीया दिली की," भंडारा श्री खंडोबाच्या पुजेसाठी वापरला जातो. विखे पाटलांनी त्या घटनेतील भंडाऱ्याकडे देवाचा आशीर्वाद म्हणून पहावे."

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येतील 9% लोकसंख्या हि धनगर समाजाची आहे. धनगर समाज विमुक्त जाती आणि भटक्या जातीतील 'क ' श्रेणीत मोडतो. परंतु समाजाला एसटी प्रवर्गात शामिल करून घ्यावे अशी मागणी धनगर समाजाची आहे. एसटी प्रवर्गाला एकूण 7% आरक्षण असून जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण भेटले तर त्यांना 3.5% कोटा उपलब्ध होण्याचे शक्यता सूत्रांमध्ये दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने