राजधानी नवी दिल्ली येथे 2 दिवसांकरिता G20 परिषद आयोजित केली गेली आहे. या परिषदेत जगातील श्रीमंत तसेच पावरफुल देशांचे नेतृत्व करणारी नेतेमंडळी आमंत्रित असल्याने स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
स्थानिक वृत्तानुसार, भारतीय रेल्वेने 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान किमान 200 प्रवासी ट्रेन सेवा तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्याचा आणि वळवण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली विमानतळावरील एकूण 80 देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात येणार आहेत.
नक्की काय असते G20 परिषद?
G20 परिषद जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांच्या अर्थमंत्र्यांची तसेच केंद्रीय बँक गव्हर्नन्सची संघटना आहे. यात एकूण 20 देशांचा समावेश असून याचे नेतृत्व यूरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन सेंट्रल बँक करतात. G20 ची सुरुवात 1999 मध्ये आशिया खंडावर आलेल्या आर्थिक संकटानंतर झाली. "जागतिक आर्थिक संकटात आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक सहकार्य वाढवणे" या परिषदेचा मुख्य हेतू होता.
कोणकोणते देश आहेत G20 चे सदस्य?
G20 परिषदेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.
