भारताचे राष्ट्रपती दौप्रदी मुर्मु यांनी G20 परिषदेतील सदस्य देशांना पाठवलेले डिनरचे आमंत्रण वादाच्या भवऱ्यात सापडले आहे. आमंत्रण पत्रिकेत 'President Of India' ऐवजी 'President Of Bharat' असं नमूद असल्याचे समोर आल्याने देशाचे नाव आता इंडिया ऐवजी भारत असणार का? हा प्रश्न भारतीयांना पडला आहे.
सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे की इंडिया हा शब्द इंग्रजांचा वारसा आहे जे मिटवले गेले पाहिजे. तसेच हल्लीच तयार झालेल्या विरोधकांच्या युतीचे नाव INDIA असल्याने सत्ताधाऱ्यांना INDIA चा तिरस्कार वाटत असेल असे म्हणणे विरोधकांचे आहे. इंडिया आणि भारत दोन्ही नावांवरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादविवाद होत आहे.
काय आहे भारत नावामागचा इतिहास ?
भारत हे नाव महाभारतकालीन असून राजा भरत यावरून पडले आहे. ‘भारत’ हे संस्कृत नाव असून भा म्हणजे 'विद्येचा प्रकाश' आणि रत म्हणजे 'पसरवणारा.' भारत म्हणजे ज्ञानाची अशी ज्योत जी अंधाराचा विनाश करते आणि जगभरामध्ये विद्या पसरवते. भारतीय संविधानानुसार, भारत हे राष्ट्राचे अधिकृत नाव आहे.
'India' कशी झाली भारताची ओळख?
विविध लोकांची विविध भाषा आणि विविध भाषा बोलण्याचे विविध लहेजे! याच कारणामुळे भारताला जागतिक पातळीवर इंडिया अशी ओळख मिळाली. भारताला परकीय आक्रमकांचा फार मोठा इतिहास आहे. पण त्यातील महत्वाचे परकीय आक्रमक म्हणजेच इंग्रज! इंग्रजांनी हिंदुस्तान उच्चारण्यात अडचण येत असल्याने इंडस आणि इंडिया या नावांचा शोध लावला. ज्यातील इंडिया ही भारताची ओळख बनली असून, याला भारतासह अधिकृत दर्जेचा मान आहे.
